मुंबईत अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. दिवसरात्र मेहनत घेऊन आपलं व आपल्या कुटुंबाचं पोट भरत असतात. आईवडिलांचं स्वप्न उराशी बाळगून जगत असतात. मात्र फरक एवढाच असतो कि काहींना खूप खडतर परिस्थितून जावं लागत तर काहींना सर्व काही आपलं आयुष्य अगदी आरामात घालवत असतात. पण कष्ट करायचे म्हटलं तर त्याला वयोमर्यादा नसते हे मात्र खरं.
अशाच एक गोंडस आणि अगदी वयाने १० ते १२ वर्षाचा मुलगा मुंबईतील दादरच्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर स्व:ताच्या हाताने बनवलेली कागदी रंगीबेरंगी चक्र विकत असतो. सध्या संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीशी लढतंय. कोणी मरणाच्या भीतीने घराबाहेर पडत नाहीय तर काहीजण काहीच पर्याय नाही म्हणून घराबाहेर पडतायत.
२ वेळची चूल घरात पेटावी म्हणून कोणत्याही विषाणूला न घाबरता आपले काम चोख पार पाडतायत. मात्र हा मूलगा कोरोनासारख्या विषाणूला न घाबरता आपली कला सांभाळून व आपल्या घरची परिस्थिती लक्षात घेऊन आपली ती रंगांनी भरलेली चक्र हातात घेऊन ७ ते ८ तास उभा असतो.
सध्या शाळा बंद असल्याने व लॉकडाऊन असल्याने घरी बसून काय करावे व घरी बसल्यास घर कसे चालणार या भीतीने तो मुलगा कसला हि विचार न करता इवलुसे मास्क तोंडाला बांधून रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभा असतो.
त्या चिमुल्याकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या कलेला आणि वयाला मर्यादा नसते फक्त काम करण्याची इच्छा आणि कोरोनासारख्या विषाणूंला न घाबरता त्या संकटाना न घाबरता प्रत्येक परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे.