२०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात आरबीआयने जारी केलेल्या नियमानुसार मे महिन्यात १२ दिवस बँकांना सुट्टी देण्यात येत आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे एसएलबीएसने अनेक राज्यांत निवेदन देत बँकेतील कामकाजाचे तास कमी करण्याबद्दल विनंती केली आहे.
वाढत्या संक्रमणामुळे ५०% हजेरी मध्ये बँक कर्मचारी काम करत असून त्यांच्यावर कामाचा ताण येत असल्याने काही सवलत देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान भारतीय रिजर्व बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह रविवारचाही समावेश असून १२ दिवस बँका बंद राहणार आहेत.
काही सण उत्सव हे देशपातळीवर साजरे करण्यात येत नाही असे सण उत्सव वगळता संपूर्ण देशात सुट्ट्या जाहीर होणार नाहीत. त्यामुळे १,७,१३,१४,२६ या दिवशी येणाऱ्या सणांचे ज्या ठराविक राज्यांमध्ये महत्व प्राप्त आहेत त्या राज्यात सुट्ट्या जाहीर होतील.