अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी, रिया चक्रवर्ती आणि क्रिस्टल डिसोजा यांचा समावेश असलेला बहुचर्चित चहेरे चित्रपट ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत आला आहे. पण कोविड -१९ मधील वाढती संख्या दरम्यान हा चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याने चित्रपटाच्या चित्रपटासाठी काही काळ थांबावे लागेल असे दिसते.
AMITABH – EMRAAN: #CHEHRE RELEASE PUSHED AHEAD… #Chehre – which was scheduled for release on 9 April 2021 – has been postponed… A fresh date will be announced later… Stars #AmitabhBachchan and #EmraanHashmi… OFFICIAL STATEMENT… pic.twitter.com/LBMEaP4Ao0
— taran adarsh (@taran_adarsh) March 30, 2021
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ‘चेहरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकल्याचे सांगितले आहे. ‘अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत असणारा चित्रपट चेहरे ९ एप्रिल २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण आत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाती तारीख कळवण्यात येईल’ असे त्यांनी ट्वीमध्ये म्हटले आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात पुनरागमन करत आहे. निर्मात्यांनी रियाला चित्रपटाच्या पोस्टर्स आणि टीझर्समधून हटवले असले, तरी ट्रेलरमध्ये रिया दिसल्यानंतर हा चित्रपट चर्चेत आला होता.