पंढरपूर- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशावेळी भाजपला एक मोठा धक्का बसलाय. कल्याणराव काळे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसचीमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.८ एप्रिल म्हणजे गुरुवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता नक्की झालंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. मात्र याचा फायदा राष्ट्रवादीला मोठया प्रमाणात होणार असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी म्हटलं होतं. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुरांडे पेटले.
आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले होते.