कोलकाता नाईट रायडर्सच्या नितिश राणानंतर आता दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेल याला कोरोनाची लागण झाली आहे.सध्या तो विलगीकरणामध्ये असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांनीच म्हणजेच ९ एप्रिलपासून इंडियन प्रिमीयर लीग, अर्थात आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सुरुवात होणार आहे.
पण सुरु होण्यापूर्वीच यामध्ये सहभागी झालेल्या दिल्लीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण, संघातील ऑलराऊंडर म्हणून ओखळ असणारा खेळाडू अक्षर पटेल याला कोरोनाची लागण झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं.
स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीने होणार आहे. त्यानंतर दिल्लीला १० एप्रिलाला आपला पहिला सामना खेळायचा आहे. पण त्याआधीच अक्षर पटेला कोरोना झाल्याने टीमला मोठा धक्का बसला आहे.