मुंबई- मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक गोष्टीचा तुटवडा निर्माण होत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक गोष्टी अपुऱ्या पडत आहेत. कित्येक रुग्णांना बेड मिळत नाहीत तर कित्येक रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याची परिस्थिती समोर येत आहेत.याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षण असतील त्यांच्यावर आता मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उपचार होणार आहेत. आजपासून दोन हॉटेल्स खाजगी रुग्णालयाचा भाग म्हणून काम करणार आहेत. यासंदर्भात मुंबई महापालिकेने परिपत्रक जारी केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता खासगी रुग्णालय रुग्णांच्या उपचारासाठी ४ किंवा ५ स्टार हॉटेलचा वापर करणार आहे. यामुळे ज्या रुग्णांना बेडची सर्वाधिक गरज आहे, त्यांना बेड उपलब्ध होईल. तसेच हॉटेल्सना कोरोना रुग्णांसाठी २० रुमची गरज असून याशिवाय २४ तास डॉक्टर, नर्स, औषधं आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असेल. या सुविधेसाठी रुग्णालय चार हजारांपर्यंतचं शुल्क आकारु शकतात. जर रुग्णासोबत कोणी राहत असेल तर हे शुल्क सहा हजारांपर्यंत असेल.
याबाबत लवकरच खासगी रुग्णालय हॉटेलसोबत करार करण्यात येणार आहे. या सगळ्या कामांवर देरखेख ठेवण्यासाठी मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.