राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा र्निमाण आहे. याच संदर्भात इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.
त्यानंतर रात्रीच्या ११.३० च्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस थेट पोलीस स्टेशनला पोहचले. व पोलिसांवर दबाव आणला व अडथळा र्निमाण करण्याचा प्रयत्न केल्याने फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप पळसे यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली व माध्यमांशी बोलताना त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरकारी कामात अडथळा आणला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच केवळ राज्यांमध्ये निवडणुका लावणं आणि गल्लोगल्ली प्रचार करत हिंडणं एवढंच काम आहे का केंद्र सरकारचं? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.