मुंबई। कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील मुंबई महानगरातील रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मनात कोरोनाची भीती पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाचे पालन करण्यासाठी जागृत प्रवासी पुढाकार घेत आहेत.
मात्र, वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो १ मध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या होत्या. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या वाढण्यामागे मेट्रोचा प्रवास कारण ठरू नये, असे मत मेट्रो प्रवाशांचे आहे. त्यासाठी मेट्रो प्रशासनाच्यावतीने मेट्रोच्या आजपासून सुमारे ४०० फेऱ्यांपैकी २८० फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लॉकडाऊन काळात मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. मात्र काही महिन्यानंतर ती पुन्हा सुरळीत चालू करण्यात आली. परंतु पुन्हा अजून कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडू नये , यासाठी मेट्रोच्या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.