कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्यात १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर १ मे ला लॉकडाऊन संपेल अशी चर्चा सुरू होती. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये यासंदर्भातला निर्णय झाल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत.”लॉकडाउनसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे.
लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याची परिस्थिती सध्या राज्यात आहे. त्या अनुषंगाने सध्याच्या लॉकडाउनच्या शेवटच्या दिवशी त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल’, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. शेवटच्या दिवशी नक्की १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाऊनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि ती किमान १५ दिवसांची होईल असा माझा अंदाज आहे”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. व या संदर्भातील माहिती ३० एप्रिला देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.