मुंबई दि.१७- मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या अंबानीच्या घरच्यां बाहेर स्फोटकाने भरलेली मोटार सापडल्यानंतर ते प्रकरण राज्यात चांगलंच गाजतयं, मनसुख हिरेन प्रकरणी सचिन वझेना एनआयएने अटक केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची बदली होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाचं जबाबदारी पद देण्यात आले आहे.