मुंबई । मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. शनिवारी रात्री उशिरा म्हणजेच ११ वाजून ५० मिनिटांनी एनआयएनने ही कारवाई केली आहे. त्याच्या राहत्या घरी पोहचत सचिन वझे यांना ताब्यात घेण्यात आलं.
त्यानंतर आज त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अशातच सचिन वाझेना २५ तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूण १४ दिवसांच्या कोठडीची एनआयएने कोठडी मागितली होती. मात्र एनआयए कोर्टानं केवळ दहा दिवस म्हणजेच, २५ तारखेपर्यंत सचिन वाझे यांनी एनआयए कोठडी सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. काल रात्री रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. अटकेपूर्वी तब्बल १३ तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. अशातच आज त्यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असून एनआयएकडून त्यांना २५ तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.