मुंबई:- सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं सावट आहे. अश्यात दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. सध्या महाराष्ट्र कोरोनापेक्षा अधिक लॉकडाऊनच्या भीतीने धास्तावला आहे.कारण, गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनने अनेकांचे उद्योगधंदे बंद झाले.अनेकांचे रोजगार गेले.अश्यातच पुन्हा राज्यात लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.मात्र,आता राज्यात व्यापारी, कामगार वर्ग यांच्या भावना विचारात घेऊन पूर्ण लॉकडाऊन ऐवजी फक्त शनिवार आणि रविवार या दोन दिवशीच राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार या चर्चांनी बाहेर राज्यातून आलेले कामगार आपापल्या गावी परतण्यासाठी तयारीला लागले होते. कामगार वर्ग,व्यावसायिक, मोठ-मोठ्या कंपन्या लॉकडाऊनला विरोध करत होत्या.मात्र,या सर्वांचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यावसायिक,नाट्य निर्माते,वृत्तपत्र संपादक,पत्रकार,राजकीय विश्लेषक,अर्थतज्ज्ञ यांच्याशी बैठक केली.यातून फक्त शनिवार आणि रविवार या दोन दिवशीच लॉकडाऊन लागू करावा असा विचार समोर आला आहे.
यावर आता मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करणार असल्याची माहितीही समोर येत आहे.राज्यात कडक निर्बंध लागले व शनिवार आणि रविवार लॉकडाऊन जाहीर झालाय याला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात येत आहे.
हे ही वाचा:-