पुणे – पुण्यात मुंबईपेक्षा कोरोना परिस्थिती भयावह आहे. मुंबईपेक्षा पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. याच संदर्भात आज पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली. पुण्यात सात दिवस सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील आयुक्त सौरभ राव यांनी माहिती दिली. याशिवाय आयुक्त सौरभ राव म्हणाले, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे. याच अनुषंगाने पायाभूत सुविधांवर भर देणं. आरोग्य सुविधा बळकट करणं, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर्स आदींची संख्या वाढवणे हे आवश्यक आहे.
पुण्यात सात दिवस काय सुरू राहणार?
लग्न, अंत्यसंस्कार कार्यक्रमाला परवानगी
लग्न सोहळ्यासाठी ५० जणांचा उपस्थित राहण्याची परवानगी
अंत्यसंस्कारासाठी २० जणांचा उपस्थित राहण्यास परवानगी
फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
हॉटेल, रेस्टॉरंटमधील पार्सल सेवा सुरू राहणार
१०वी, १२वी आणि MPSCच्या परीक्षा नियोजित वेळेत होणार
जीम आठवड्याभरासाठी सुरू असणार
आठवड्याभरासाठी पुण्यात काय बंद असणार?
PMPML बससेवा आठवडाभर बंद राहणार
सर्व धार्मिक स्थळे, मॉल्स, थिअटर्स आठवडाभरासाठी बंद
सात दिवसांसाठी हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहणार
सामाजिक, राजकीय कार्यक्रमावर बंदी
आठवडे बाजारपेठ बंद राहणार
शाळा, महाविद्यालय ३० एप्रिलपर्यंत बंद असणार