अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे यांच्या संदर्भातील एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. सचिन वाझे मागच्या आठवड्यात आजारी पडले होते त्यामुळे त्यांना लगेच मुंबईतील जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या प्रकृतीबाबत आणखी एक चिंतादायक माहिती समोर आली आहे. सचिन वाझे यांच्या हदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ९० टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे सचिन वाझे यांनी वकील आबाद पोंडा यांनी विशेष न्यायालयात सचिन वाझे यांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, वाझे यांच्या हदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अनेक ब्लॉकेज आढळून आले आहेत. वाझे यांच्यावर वेळीच उपचार न केल्यास त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता एनआयए कोर्ट काय निर्देश देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत.