बॉलवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना राणावत हिचा आज वाढदिवस आहे. कंगना प्रत्येक वेळी आपल्या हटके स्टाईलने ओळखली जाते. अभिनयाच्या जोरावर कंगनाने आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली. कंगनाला भारतीय चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100 सेलिब्रिटींच्या यादीमध्ये कंगना राणावत यांना पाच वेळा स्थान मिळाले आहे. कंगना सध्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामध्ये चर्चेत होती.
अभिनेता आदित्य पांचोली सोबत कंगनाचं अफेर असल्याची चर्चा होती मात्र एका मुलाखतीत तिने आदित्य पांचोलीवर मारहाणीचा आरोप केला. मग आदित्य व त्याच्या पत्नीने कंगणावर अब्रु नुकसानीचा दावा केला होता. सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री म्हणून कंगणाचे नाव घेता येईल.
कंगनाचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत, कित्येकदा कंगना ट्रोलिंगची शिकारही झाल्याचे पाहायला मिळते. तिला तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. ती भारताच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. यंदाचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा नॅशनल अॅवॉर्ड कंगणाला जाहीर झाला आहे.