आज भारतीय जनता पक्षाचा ४१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
या संदर्भात ते ट्विट करून म्हणतात की, ” सर्व कार्यकर्त्यांना भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा. रक्ताचे पाणी करून भाजपला विशाल वटवृक्ष बनविणा-या सर्व महापुरुषांना नमन करतो. राष्ट्रवादी विचारधारा, अंत्योदयाचा सिद्धांत आणि मोदीजींच्या नेतृत्वात देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी भाजपा निरंतर कार्यरत आहे. ”
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भाजपा कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पक्षाचे जे संस्कार आहेत, त्यांचा राजकीय अस्पृश्यतेवर विश्वास नाही. म्हणूनच सरदार पटेल यांना समर्पित स्ट्यॅचू ऑफ युनिटी बनवण्याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणूनच बाबासाहेबांसाठी पंचतीर्थ बांधण्याचा आम्हाला अभिमान आहे असे त्यांनी बोलून दाखविले होते.