मुंबई । बँकेतील निष्क्रिय खात्यांचा डेटा गोळा करून ती बेकायदेशीरपणे चोरून विकण्याच्या आरोपाखाली भाजप चित्रपट पुणे नगराध्यक्ष रोहन मंकणी याला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बँकेतमध्ये डोरमंट असलेल्या अकाउंटची चोरून माहिती गोळा करून ती बेकायदेशीरपणे देशभर सक्रिय असलेल्या बँक अकाउंट हॅक करणाऱ्या टोळीला विकणे व तसेच त्यातून नफा मिळवणे या आरोपाखाली रोहन मंकणी आणि बँक अकाऊंट हॅक करणाऱ्या टोळीला सायबर सेल ने अटक केली आहे.
विशेष बाब म्हणजे रोहन मंकणी हा जेष्ठ अभिनेते रविंद्र मंकणी यांचा मुलगा आहे. या टोळीमध्ये आठ जणांसह एका महिलेला सहभाग होता. या टोळीतील चार जण हे आयटी इंजिनिअर असून सगळे आरोपी हे ३५ ते ६० या वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, रोहन मंकणी, सुधीर भाटेवरा, अनघा मोडक, विशाल बेंद्रे, आत्माराम कदम, मुकेश मोरे, रवींद्र माशाळकर, राजीव ममेडा आणि परमजीत सिंधू या आरोपींविरोधात सायबर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.