जय श्री राम’ची घोषणा न दिल्यामुळे तृणमूल काँग्रेस सर्मथकांच्या १० वर्षाच्या मुलाला भाजपाच्या कार्यकर्त्याने बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून भाजपा कार्यकर्त्याच्या अटकेची मागणी केली आहे. सदर बातमी ‘द टेलिग्राफ या वृत्तपत्राने दिली आहे.
सदर घटना सोमवारी दुपारी घडली असून हा मुलगा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या चहाच्या दुकानाबाहेरून जात असताना त्याच्यासोबत हा प्रकार घडला. ही घटना पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील फुलिया इथे झाल्याचं या वृत्तात म्हटले आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये तयार झालेल्या निवडणुकीच्या वातावरणामुळे असे प्रकार घडताना दिसत आहे.
महादेव शर्मा हा चौथीत शिकणारा विद्यार्थी आहे. भाजप कार्यकर्त्याने महादेवाला केलेल्या मारहाणीत बराच मार लागला आहे. महादेवला उपचारासाठी रानाघाटच्या उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महादेवला झालेल्या मारहाणीमुळे स्थानिकांमध्ये जबरदस्त संताप असून त्यांनी त्या मारहाण करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याची धुलाई केली होती.
सध्या नागरिकांच्या आक्रोशामुळे पोलिसांनी भाजप कार्यकत्यांना अटक करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान तो फरार झाल्याचे कळाले असून आता त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.