बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने कोरोना विषाणूंवर मात करून रुग्णालयातून घरी परतला आहे, तो घरी आल्याची माहिती प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शक व अक्षयची पत्नी ट्विकल खन्ना हिने तिली आहे. तिने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केलीय व अक्षय कुमार घरी परतल्याचे सांगितले आहे.
इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. तिचा आणि अक्षयचा हा अॅनिमेटेड फोटो आहे. या फोटोला तिने कॅप्शनही दिलं आहे. यात ती म्हणते, “सुरक्षित आणि व्यवस्थित, त्याला पुन्हा आसपास पाहून बरं वाटत आहे.” अक्षय आणि ट्विंकल हे घरात असल्याचं या फोटोवरुन कळत आहे. अशा पद्धतीने ट्विंकलने अक्षय दवाखान्यातून घरी परतल्याचं जाहीर केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली होती. ‘रामसेतू’ या चित्रपटाची अक्षय कुमार शुटिंग करत असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. तसेच सेटवरील ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.