सर्वसामान्यांना मदतीचा हात पुढे करणारा खऱ्या आयुष्यातील रिअल हिरो सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. सोनू सूद हा आपल्या कार्यामुळे कायम चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सोनू सुदने पुन्हा कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी हात पुढे केला होता. त्याने मध्यप्रदेशमधील इंदूर येथे त्याने रुग्णालयांना मदत केली असून दहा ऑक्सिजन जनरेटर इंदूरला पाठवले. मात्र आज त्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्याची त्याने ट्विट केलं आहे.
???? pic.twitter.com/ZRkapUQXFK
— sonu sood (@SonuSood) April 17, 2021
‘माझी कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली असून मी स्वतः घरातच विलगीकरणात आहे. घाबरण्याची गरज नाही मी ठीक आहे . याउलट तुमच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे आता जास्त वेळ मिळाला आहे. लक्षात ठेवा तुमच्या कोणत्याही परिस्थितीत मी तुमच्या सोबत आहे’ असा दिलासादायक ट्विट सोनू सूदने केलं आहे.