मुंबई। आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर खानच्या टीमने ही माहिती दिली आहे. सध्या आमिर खानने स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं आहे.
“आमिर खानची कोविड -19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तो सध्या आपल्या घरी होम-क्वॉरंटाईनमध्ये आहे आणि सर्व नियमांचे पालन करत आहे. आमीरची तब्बेत ठीक आहे. नुकतेच आमीरच्या संपर्कात जे आले असतील त्यांनी खबरदारी म्हणून त्यांची कोविड 19 चाचणी करून घ्यावी. आपल्या चिंता आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशी माहिती आमिर खानच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
आमिर खानने १४ मार्च रोजी आपला ५६ वा वाढदिवस साजरा केल्या. त्यानंतर दुसर्याच दिवशी आमिरने सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली होती.