सध्या कोरोना विषाणूने देशात थैमान घातल्याने कडक निर्बंध करण्यात आले आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक घरूनच काम करत असल्याने सोशल मीडियाचा प्रचंड वापर केला जात आहे. त्यात सोशल मीडियावर अनेक गाणी व्हिडीओ येत असल्याने लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. त्यात आता टिकटॉक बंद झाल्यापासून इन्स्टाग्रामवरील रिल्सने धुमाकूळ घातला आहे.
एखादे नवीन गाणे आले की त्यावर हजारो व्हिडिओ बनवले जातात आहेत.मागिल काही दिवसांपूर्वी गावरान मुंडे या गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवले होते. या गाण्यानंतर आणिखी एक नवीन भन्नाट गाणं ‘खासरे म्युझिक’ यांनी आणलं आहे.
पांडबाच्या रानातला ऊसाचा रस’ असं हे गाण आहे. सिंगर लुईस पॉन्सी आणि डॅडी यांकी याच्या ‘डेस्पसीतो’ या गाण्याच्या चालीवर या तरुणांनी रॅप सॉंग बनवलं आहे. या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या गाण्याचं नाव ‘ऊसाचा रस’ असं असून, या गाण्याची सुरूवात उन्हाळा २०२१ अशानी होते. आता सध्या सगळीकडे कडक उन्हाळा पडला आहे. याच मुद्याला धरून त्यांनी गाण्यात याची सर्व उन्हाची स्थिती सांगतली आहे. तसेच या दिवसांमध्ये ऊसाचा रस पिणंही तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं आहे.