आज २४ मार्च २०२१ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात
• महाराष्ट्र आरोग्य सेवा गट-अ मधील पद्व्युत्तर पदविका व पदवी धारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ – सार्वजनिक आरोग्य विभाग
• राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील थेट नियुक्त प्राचार्यांच्या वेतन निश्चितीस मान्यता- उच्च व तंत्रशिक्षण
• सर्व महसुली विभागांत अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा समप्रमाणात भरणार. सरळसेवा व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम 2021 ही नवीन अधिसूचना काढणार- सामान्य प्रशासन
• गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व डेड रेंट दरात सुधारणा करण्याचा निर्णय- महसूल
• सारथी संस्थेस शिवाजीनगर पुणे येथे शासकीय जागा – महसूल
• पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेस पुणे जिल्ह्यातील चिखली येथे विस्तार केंद्रासाठी जागा- उच्च व तंत्रशिक्षण
* रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय. शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास मंजुरी- उच्च व तंत्रशिक्षण विभाग
*अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास सुधारित मान्यता