बुलडाणा :शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमाल चोरणाऱ्या सराईत टोळीला बुलडाणा जिल्हा पोलीस दलाने जेरबंद केले असून त्यांच्या जवळुन 30 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी 3 आरोपीला जेरबंद केले आहे. अटक केलेल्या आरोपी मध्ये फारुख शहा मेहबूब शहा, शाहरुख उर्फ रहमान शहा, शेख जहांगीर शेख हमजा या तिघांचा समावेश असून हे तिन्ही आरोपी अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलीस दलाच्यावतीने देण्यात आली .
यासंदर्भात आज जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भाची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. या सराईत गुन्हेगारांकडून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार ,चिखली ,मेहकर, जानेफळसह विविध ठिकाणी केलेल्या शेतमालाच्या चोरी संदर्भाची कबुली त्यांनी दिली अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.