अलिशान गाडी खरेदी करणे हे सगळ्याचे स्वप्न असत परंतू सर्वानाचं ते परवडते अस नाही, म्हणूनच बहुतेक कार कंपन्या एप्रिल महिन्यात उत्तम ऑफर देत आहेत . मारुती, होंडा ते रेनॉपर्यंत जवळजवळ सर्वच प्रमुख कार उत्पादक कंपन्या एप्रिल २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणात सवलती देत आहेत.या ऑफर्समध्ये ग्राहकांना ८५,८०० रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. आपण या महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण या कार्सचा विचार करु शकता.
Renault Kwid
Renault Kwid ही कार २०००० रुपयांच्या एक्सचेंज बोनस आणि १०,००० रुपयांच्या रोख डिस्काऊंटसह विकली जात आहे. या व्यतिरिक्त या कारच्या १.० लीटर व्हेरिएंटवर १०,००० रुपयांची कॉर्पोरेट सूटदेखील उपलब्ध आहे. दुसरीकडे, सर्व Kwid व्हेरिएंट्सवर १०,००० रुपयांचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे. Kwid व्हेरिएंट्सवर १०,००० रुपयांचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे. क्विड व्यतिरिक्त रेनॉ कंपनी त्यांच्या Triber, Kiger आणि Duster SUV या मॉडेल्सवरही सूट देत आहे.
होंडा सिटी (Honda City)
होंडा आपल्या नवीन पाचव्या जनरेशन सिटी सेडानच्या खरेदीवर सवलत आणि लाभ देत आहे. सध्या या कारच्या सर्व व्हेरिएंट्सवर १०,०००रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर देण्यात आली आहे. त्याशिवाय होंडाच्या विद्यमान ग्राहकांना ५,००० रुपयांचा निष्ठा (लॉयल्टी) बोनसही देण्यात येत आहे.
मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno)
मारुती बलेनो या कारवर एकूण ३३,००० रुपयांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. यामध्ये २०,००० रुपयांपर्यंतची रोख सवलत, १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३,००० रुपयांच्या कॉर्पोरेट सवलतीचा समावेश आहे. या ऑफर बलेनो हॅचबॅकच्या बेस-स्पेक सिग्मा व्हेरिएंट्सवर लागू आहेत. दुसरीकडे, बलेनोच्या सीव्हीटी व्हेरिएंटवर कोणतीही रोख सवलत देण्यात आलेली नाही. याशिवाय इग्निस, सियाझ एक्सएल – ६ आणि एस-क्रॉस सारख्या मारुती कारसुद्धा अशाच सवलतीत उपलब्ध आहेत.
ह्युंदाय सँट्रो (Hyundai Santro)
ह्युंदाय मोटर इंडियाने आपली लाँगबॉय हॅचबॅक सँट्रोच्या (Hyundai Santro) खरेदीवर ३५,००० रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. या रकमेत २०,००० रुपयांपर्यंतची रोख सवलत आणि १०,००० रुपयांपर्यंतच्या फायनॅन्स बोनसचा समावेश आहे. याशिवाय सॅंट्रोच्या खरेदीवर ५,००० हजार रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे.
Mahindra XUV300 आणि XUV500 SUV
एप्रिल महिन्यात महिंद्राची कॉम्पॅक्ट एसयूव्ही-एक्सयूव्ही ३०० (Mahindra XUV300) च्या खरेदीवर ग्राहक एकूण ४४,५०० रुपयांपर्यंतचा फायदा घेऊ शकतात. या रकमेमध्ये १०,००० रुपये रोख सूट,२५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४,५०० रुपयांच्या कॉर्पोरेट सवलतीचा समावेश आहे. XUV500 मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे.
टाटा नेक्सन (Tata Nexon) आणि हॅरियर एसयूव्ही (TATA Harrier)
टाटाची कॉम्पॅक्ट SUV – Nexon च्या डिझेल व्हेरिएंटवर १५,०० रुपयांचा एक्सचेंज लाभ मिळत आहे. दुसरीकडे, हॅरियर कॅमो, डार्क एडिशन, XZ + आणि XZA + ४०,००० रुपयांच्या एक्सचेंज बोनससह खरेदी करता येईल. हॅरियर एसयूव्हीचे उर्वरित ट्रिम अनुक्रमे २५,००० रुपये आणि ४०,००० रुपयांच्या रोख डिस्काऊंट आणि फायनॅन्स लाभांसह आहेत.