कुत्रं मेलं तरी आमचे नेते दुःख व्यक्त करतात, पण शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 250 शेतकऱयांचा मृत्यू झाला आहे तरी त्यांना दुःख होत नाही. मोदी सरकारने मला राज्यपालपदावरून हटवले तरी बेहत्तर. मी राजीनामा देईन, पण शेतकऱयांच्या बाजूने बोलणे कदापि सोडणार नाही, असे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज सांगितले.
हे नेते गप्प आहेत. हे अत्यंत क्लेशदायक आहे, अशा स्पष्ट शब्दांत मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला.
शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये फारसे अंतर नाही. चर्चा केल्यास मार्ग निघेल. किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपी मिळाली पाहिजे या मुद्दय़ावरून हे आंदोलन सुरू झाले. ‘एमएसपी’चा कायदा केल्यास प्रश्न सुटू शकेल असे मलिक यांनी झुंझनु येथे एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित असताना पत्रकारांशी संवाद साधला आहे.