देशात झपाट्याने कोरोनाचा प्रसार होत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत आहे, अशातच हरिद्वारमधील दोन्ही शाही कुंभमेळा साजरे करण्यात आले. मात्र तिथे होणाऱ्या तुडुंब गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार व वाढण्याची शक्यता आहे. पार पडलेल्या कुंभमेळा शाही स्नानात आधीच अनेक साधू पॉसिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. हे सर्व परिस्थिती लक्षात घेता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांना फोन केला. व देशाची परिस्थिती पाहता साधुसंताना आवाहन केले आहे.
मैंने प्रार्थना की है कि दो शाही स्नान हो चुके हैं और अब कुंभ को कोरोना के संकट के चलते प्रतीकात्मक ही रखा जाए। इससे इस संकट से लड़ाई को एक ताकत मिलेगी। @AvdheshanandG
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021
कुंभमेळ्याच्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग आणखी वेगाने पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. काही साधुसंतांना कोरोना झाला आहे. या साधुसंतांचे उपचार सुरू आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पंतप्रधान मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करा, असे आवाहन साधुसंतांना केले आहे.
महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांनीही परिस्थितीचे भान राखून सर्व साधुसंतांना कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन स्वामी अवधेशानंद गिरी यांनी केले.