मुंबई- सध्या कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. अनेक चित्रपट व मालिकांच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव झाल्याने शूटिंग बंद करण्यात आली आहे. सेटवर गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार होऊ शकतो त्यामुळे चित्रिकारणास बंदी घालण्यात आली आहे.
दिवसेंदिवस राज्यात रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारकडून कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. मात्र त्यात सतत बदल होत असल्याने रक्षण करणाऱ्या पोलिसांचे यात हाल होत आहेत. गरज नसतांनाही लोक विनाकारण विना मास्क नागरिक रस्त्यावर उतरून मनमानी करत आहेत. निर्बंधाची आणि नियमांची अंमलबजावणी अगदी काटेकोरपणे केली जात आहे की नाही, यावरच पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. चोवीस तास अहोरात्र आपल्या कर्तव्यासाठी संकटाला पाठीवर मारणाऱ्या या यंत्रणेत काम करणाऱ्या कैक पोलीस कर्मचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यामुळे पोलिसांच्याही वैयक्तिक गरजा असतात त्यासाठी त्यांना थोडी मदत म्हणून गरजा भागवण्यासाठी आता शहरातील वॅनिटी व्हॅन मालकांनी त्यांची ही वॅन मुंबई पोलिसां च्या सेवेत देण्याचा निर्णय घेतला आहे. कपडे बदलणं आणि शौचालयाच्या सुविधेसाठी आतापर्यंत जवळपास ४ वॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेत देण्यात आल्या आहेत.दहिसर, दिंडोशी, मालाड आणि घाटकोपर या भागांमध्ये या व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत.