संपूर्ण राज्यभरात करोना महामारीने थैमान घातले असून आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये करोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्री त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व मिलिंद नार्वेकर हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.
करोना लसीसंदर्भातील लोकांचा संभ्रम दूर व्हावा या हेतूने उद्धव ठाकरेंनी करोनाची लस घेतली असून सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लस घेतल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी कोव्हिशिल्ड ही लस घेतल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंबरोबरच मिलिंद नार्वेकर यांनीही करोनाची लस घेतली आहे.