मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. राज्यातील वाढता कोरोना, लॉकडाऊन, कोरोना लसीकरण या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. फेसबुक लाईव्हद्वारे ते जनतेशी संवाद साधणार आहेत. एकीकडे कोरोनाचा उद्रेक होत आहे तर दुसरीकडे आज मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शासनाच्या उपाययोजनाही कोरोनाची साखळी तोडण्यात तोकड्या पडत असल्याचं चित्र निर्माण झाल आहे. राज्यातील वाढत्या कोरोनामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे.
तर दुसरीकडे देशभरात उद्यापासून १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या सर्व मुद्द्यांवर उद्धव ठाकरे आज बोलण्याची शक्यता आहे.
काही वेळापूर्वीची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १८ वर्षीय नागरिकांसाठी सुरु होणाऱ्या लसीकरणाबाबत मोठं व्यक्तव्य केलं आहे. १५ मे नंतर १८ वर्षीय नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल आहे. मात्र आता मुख्यमंत्री आज संध्याकाळी काय बोलणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.