मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम जनतेला नवं-वर्षाच्या तसेच गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट करून सर्वांना आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.
कोरोनावर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी, असं आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे. आरोग्य सेवक, परिचारिका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणातील कोविडयोद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबुया. नेहमीच्या प्रथा-परंपरांना थोडं बाजूला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करूया.
गर्दी नकोच, मास्क अनिवार्य आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीतून कोरोनावर मात करणे ही आरोग्याची गुढी यावर्षी महत्वाची आहे. यातून येणारे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी, सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, असा विश्वास आहे. या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणूवर मात हीच आरोग्याची गुढी! गर्दी टाळणे,मास्कचा वापर व वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देताना केले आहे. हे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्य, सुख-समृद्धी, भरभराट घेऊन येवो.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2021