मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी तसेच दैनिक सामनाच्या संपादक सौ रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना गिरगावच्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रश्मी ठाकरे मागच्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर त्या घरीच विलगीकरणात होत्या. पण काल (३० मार्च) त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची माहिती समोर आली आहे. रश्मी ठाकरे यांना दक्षिण मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
२३ मार्चला रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यापूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना २० तारखेला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रश्मी ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव यांच्याबरोबर कोरोनाची लससुद्धा टोचून घेतली होती.