सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूनंतर बॉलीवूड तसेच साऊथ इंडस्ट्रीतील अनेक ड्रग ऍडिक्ट सेलिब्रिटी ची नावे समोर आली.अजूनही सिनेविश्वाला लागलेलं ड्रग च ग्रहण अद्याप सुटलेलं नाही.
अश्यातच आता एजाज खान या बॉलिवूड अभिनेत्याचे नाव ऍड झाले आहे.एजाज खान च्या अटकेनंतर
जोगेश्वरीमध्ये एनसीबीने छापे मारले असता सुमारे दीड कोटी रुपयांचा ड्रग साठा जप्त केला आहे.
तर राजस्थान मध्ये दाऊद चा सहकारी दानिश चिकनाला अटक करण्यात आली असून एनसीबीने त्याच्याकडे असलेला चरस चा साठा जप्त केला आहे.
एजाज खानच्या अटकेनंतर चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी जोगेश्वरी येथे छापा टाकल्याने ड्रग साठा जप्त करण्यात आला आहे.