आसाम : संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा हौदोस माजवायला सुरवात केली आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाटयाने वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णासाठी वरदान ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची आता सर्व देशभरातून मोठया प्रमाणात मागणी वाढलेली आहे. मात्र इंजेक्शनची असेलेली अव्वाच्या-सव्वा किंमत अनेक सामान्य नागरिकांना न परवडणारी आहे.
याच पार्श्वभूमीवर आसाम सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. रेमडेसिवीर हे औषध दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे. आसामच्या आरोग्य विभागाने सांगितले की, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना रेमडेसिवीर मोफत देण्यात येईल तर इतर नागरिकांना सरकारने ठरवून दिलेल्या दरात रेमडेसिवीर खरेदी करावे लागणार आहे.
केंद्रीय रसायने आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगतले, रेमडेसिवीरचे देशांतर्गत दुप्पट उत्पादन करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 12 एप्रिल 2021 पासून आतापर्यंत आणखी 20 कारखान्यांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे मदत करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.