कोरोना विषाणूमुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. त्यात भारतातील कोरोनाचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत. जरी संपूर्ण देशात कोरोना लसीकरणला सुरूवात झाली असली तरी कोरोना विषाणू नियंत्रणात येण्यास सर्वत्र शर्तीचे प्रयत्न चालू आहे. भारतात रुग्ण झपाट्याने वाढतायत व अनेक गोष्टीचा तुटवडा निर्माण होत आहे. औषध, रुग्णांसाठी बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन अशा अनेक गोष्टीचा तुटवडा निर्माण होत असल्याने अमेरिकेतील नागरिकांनी भारत जाणं टाळावे असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
Amid a surge in COVID cases (in India), travellers should avoid all travel to India. Even fully vaccinated travellers may be at risk for getting & spreading variants and should avoid all travel to India. If you must travel to India, get fully vaccinated before travel: CDC, USA pic.twitter.com/VrLK4hpZRA
— ANI (@ANI) April 20, 2021
अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने सावधगिरीचा इशारा अमेरिकनं नागरिकांना दिला आहे. भारतात कोरोना उद्रेक झाल्यामुळे नागरिकांनी भारताचा दौरा करणं टाळावं, असं संस्थेनं म्हटलं आहे. पूर्णपणे लसीकरण झालेलं असलं तरीही संसर्ग होण्याचा व विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतात जाणं टाळावं. जर जाणं अत्यावश्यक असेल, तर आधी पूर्णपणे लसीकरण करून घ्यावं,” असा सल्ला रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने अमेरिकन नागरिकांना दिला आहे.
भारतात दिवसाला २ लाखाहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे भारतासह इतर देश सतर्क झाले आहेत.