नाशिक – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णाची संख्या वाढत असल्याने अनेक गोष्टीचा तुटवडा र्निमाण होत आहे. अनेक ठीकाणी लोकांना बेड अपुरे पडत आहेत तर कित्येक ठीकाणी आॅक्सिजन अपुरे पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकात महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पुढाकार घेत बालगणेश फाऊंडेशनच्या माध्यमातून ऑक्सिजन बँक सुरू केली.
याद्वारे गरजू रूग्णांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर पुरवण्यात येणार आहेत. व यासाठी एक हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. ९०२१९८६९६७या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त १५ दिवसांसाठी हे कॉन्सेंट्रेटर बुक करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.