दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं कोरोनावर मात करत संघात पुनरागमन केलं आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनावर मात केल्यानंतर तो दिल्लीच्या ताफ्यात रुजू झाला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला दिलासा मिळाला आहे.
३ एप्रिलला अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्याला कोरोनाची साधी लक्षणं दिसत होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला पुढील तपासणीसाठी पाठवलं होतं. तिथे अक्षर पटेलवर तीन आठवडे यशस्वी उपचार केले. आता कोरोनावर मात करुन अक्षर पटेल पुन्हा एकदा संघात सहभागी झाला आहे. या संदर्भात त्याने एक ट्विट केलं आहे.
???? | Smiles and hugs all around as Bapu returned to the DC camp ????????
Oh, how we missed you, @akshar2026 ????
P.S. Kya challlaaaaa? ????#YehHaiNayiDilli #IPL2021 #DCAllAccess @OctaFX @ITCGrandChola pic.twitter.com/wRl1I1M5dW
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 22, 2021
“बापू (अक्षर पटेल) दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सहभागी झाला आहे. तो आल्याने सर्वजण आनंदी आहेत”, असं ट्वीट दिल्ली कॅपिटल्सने केलं आहे. ‘माणसं बघून मला मजा येत आहे’, असं अक्षर पटेल व्हिडिओत सांगताना दिसत आहे.