बारामती दि.१९- बारामतीमधील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त करून प्रशासनाला कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणेबाबत निर्देश केले आहेत. त्याच अनुषंगाने आज नगरपरिषदेमध्ये ४५० लोकांचे पथक तयार करून यामध्ये प्रामुख्याने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या प्रभावी अंमलबजावणीव्दारे कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्ती शोधून त्यांची तपासणी संख्या वाढविणे,प्रतिबंधित क्षेत्रात आणि सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे,शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लस घ्यावी याकरिता जनजागृती करणे अशा उपाययोजना तातडीने करण्याचे सुरू आहेत.
४५० लोकांच्या पथकामध्ये २ कर्मचारी याप्रमाणे २२५ पथके तयार करण्यात आली आहेत.बारामती शहरातील १९ प्रभागांचे सर्वेक्षण आठवड्याभरात पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक प्रभागाकरीता दररोज ३० पथकांमार्फत सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे.या प्रत्येक पथकांसोबत मदतीकरीता १ स्वयंसेवक देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.