रत्नागिरी– वाढत्या कोरोना प्रादुर्भामुळे जिल्ह्यात रविवारी संचारबंदी लागू करण्यात आली. मेडिकल आणि दवाखाना वगळता सर्वच दुकाने बंद असल्यामुळे प्रत्येक चौकात आणि नाक्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला.
जिल्हा प्रशासनाच्या कडक निर्बंधांमुळे मासे, मटण व चिकन विक्रेत्यांनी दुकाने बंद केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील मांसाहार खवय्यांचे चांगलेच हाल झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत.तसेच कोरोनाची साखळी वाढू नये यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून नागरीकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यात लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बागायत दारांना याचा चांगलाच फटका बसला आहे. मोसमातील आंबा प्रक्रिया पूर्ण होत असून कोरोनामुळे वाहतूकदरम्यान चार जणांना परवानगी आहे. संबंधित चाचण्या अहवाल सादर केल्याशिवाय प्रवास करण्यास परवानगी नसल्यामुळे याचा आंबा विक्री परिणाम होत असल्याचे स्थानिक आंबा विक्रेत्यांनी सांगितले आहे.