झी मराठीचा पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आणि कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कारानं देऊन गौरवण्यात आलं. मात्र सर्वकृष्ट ‘सून’ या पुरस्कारादरम्यान सर्वांचा गोंधळ उडाल्याचे समोर येत आहे. आणि हा पुरस्कार ‘अंग बाई सासूबाई’ या मालिकेला मिळाला पण शुभ्रा नावात गोंधळ उडाला. खरं तर हा पुरस्कार अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला घोषित केला गेला. परंतु हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नवी शुभ्रा अर्थात अभिनेत्री उमा पेंढारकर मंचावर गेली होती. त्यामुळं सध्या एकच गोंधळ माजला आहे, पुरस्कार नक्की मिळाला कोणाला नव्या शुभ्राला की जुन्या शुभ्राला?
अग्गबाई सासुबाई या मालिकेत केलेल्या अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला. या मालिकेचा दुसरा सीझन सध्या सुरु आहे. अन् या सीझनचं नाव अग्गबाई सुनबाई असं आहे. या मालिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर शुभ्रा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्यामुळं अनेकांचा गोंधळ झाला. मात्र दोघांच्या व्यक्तीरेखांची नाव जरी सारखी असली तरी हा पुरस्कार अग्गबाई सासुबाई या मालिकेतील शुभ्राला म्हणजेच तेजश्रीला मिळाला आहे.