मुंबई : राज्यात विशेष करून मुंबई पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते.
त्यात पाठोपाठ आघाडीच्या प्रवक्त्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि सतत पत्रकार परिषद आणि ट्विट करून भाजपाची झोप उडवणारे सचिन सावंत यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता मंत्र्यांसोबत आघाडीच्या प्रवक्त्यांना सुद्धा कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे.
माझी रॅपिड अॅन्टीजन टेस्ट सांगते की मी करोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की, त्यांनी तपासणी करून घ्यावी. मी प्रत्येकाला विनंती करतो की करोना नियमांचे पालन करा व सुरक्षित रहा. असं सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.
My Rapid Antigen test says that I am COVID positive. I request everyone who came in contact with me to get themselves tested.
I request everyone to follow COVID protocols & stay safe. ????
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 30, 2021