मुंबई दि. ८ – सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षण प्रश्नी महत्त्वाची सुनावणी झाली. या प्रकरणी राज्य सरकारची बाजू मांडत मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आता मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली असून आजपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू झाली आहे. याठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांनी इतर राज्यांनीदेखील आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली असल्याकडे न्यायालयाचं लक्ष वेधलं. याच दरम्यान मराठा आरक्षणावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका केले आहे.
१०२ व्या घटनादुरूस्तीनंतर फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात बेकायदेशीर आहे असे म्हणून मोदी सरकारने मराठा समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अगोदरच भाजपाचा रागरंग दिसला होता ज्यावेळी @rsprasad राज्य सरकारच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. pic.twitter.com/XMHuwwP6XI
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 8, 2021
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर मराठा आरक्षणावरून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जोरदार टीका केली आहे. “102 व्या घटनादुरूस्तीनंतर फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात बेकायदेशीर आहे असे म्हणून मोदी सरकारने मराठा समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अगोदरच भाजपाचा रागरंग दिसला होता ज्यावेळी रवीशंकर प्रसाद राज्य सरकारच्या बैठकीला अनुपस्थित राहिले” असं सावंत यांनी म्हटलं आहे.