राज्यात नाही तर संपूर्ण देशभरात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातवरण पसरले आहे. आज राजकीय पुढाऱ्यांसोबत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग आता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेवर झालेला पाहायला मिळत आहे.
या मालिकेत काम करणाऱ्या चार कलाकारांना कोरोनाच्या संसर्गाने आपल्या विळख्यात घेतले आहे. सध्या घरातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं चारही कलाकारांवर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमानुसार मालिकेच्या सेटवर कोरोना चाचणी करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर तारक मेहताच्या सेटवर ११० जणांची चाचणी चाचणी करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी चार जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. या रिपोर्टमुळं सध्या सेटवर भीतीचे वातावरण पसरले आहे. या कलाकारांची नाव निर्मात्यांनी जाहीर केलेली नाहीत. मात्र यापुर्वी मंदार चांदवडेकर यांना कोरोनाची लागण झाली होती.