मुंबई। मुंबईतील कोरोनाची संख्या वाढतच आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावरील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. मागच्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली होती.
देवगिरी बंगल्यावरील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अजित पवार यांनी गुरुवारी दिली. मात्र, या नऊ जणांमध्ये कोण-कोण आहेत, बंगल्यात काम करणारे आहेत, की सुरक्षारक्षक याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सरकारी निवासस्थानातील कर्मचाऱ्यांमध्येही कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. माझ्या निवासस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली. त्यात 9 जणं पॉझिटिव्ह आढळले आहेत. असं अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तसेच एखाद्याला कोरोना झाल्यानंतर त्याचा संसर्ग झपाट्यानं वाढतो, त्यामुळे आपल्याला कोरोनाशी लढायला हवं असही ते म्हणाले.