महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याचे पाहायला मिळतंय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच अनेक जिल्हात कडक निर्बध लावले गेले आहेत. अशातच कोरोना विषाणूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरापाठोपाठ आता कार्यालयातही शिरला असल्याचे समोर येत आहे.
मुख्यमंत्री कार्यालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.संपूर्ण महाराष्ट्र या विषाणूपासून हैराण झाले आहे. त्यामुळे कोरोनाची विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी मास्क व नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.