मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात संपूर्ण कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. मागच्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून येत्या एक-दोन दिवसात लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेणार आहेत.
मात्र महाराष्ट्रात कोरोना संसर्ग का पसरला या विषयी आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीच भाष्य केले आहे. महाराष्ट्रामध्ये बाहेरील राज्यांमधून लोक येतात. तिथे काहीच नियंत्रण नाही आहे. त्यामुळेच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे, ते आज मुंबईत पत्रकार माध्यमांशी बोलताना हे विधान केले होते.
मागच्या काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा परप्रांतीय नागरिकांमुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे विधान केले होते. सध्या मोठया प्रमाणात नागरिक नोकरीच्या शोधात महाराष्ट्रात स्थलांतरित होत आहे त्याचमुळे राज्यात कोरोनाचा प्रसार होत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता.