कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक प्रचार सुरु असल्याने मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे प्रचारासाठी दोन दिवस बेळगावात होते. बुधवारी सायंकाळी त्यांना ताप आला होता. त्यावेळी तीन डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचार केले होते.
त्यानंतर गुरुवारी कोरोनाची चाचणी केली असता त्यांना कोरोनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्यांना उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ते रोड शो मध्ये देखील सहभागी झाले होते. पण रोड शो अर्ध्यावर सोडून ते हॉटेलवर परतले. मात्र अनेक लोक त्यांच्या संपर्कात आले आहेत.