मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दै. ‘सामना’च्या संपादक सौ. रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या सध्या वर्षा निवासस्थानी क्वारंटाइन आहेत.
काही दिवसांपूर्वीच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर ट्विट करत आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी स्वतःला क्वारंटाइन झाल्याचेही सांगितले होते व सगळ्यांना काळजी घेण्यास सांगितले होते.
यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली. ती चाचणी काय येतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.