उत्तराखंडमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे चित्र समोर येत आहे. अशातच पंतजली योगपीठमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पंतजली योगापीठामध्ये ८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बाब रामदेव यांची कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हरिद्वारच्या पंततली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये १० एप्रिलपासून कोरोनाचे ८३ रुग्ण आढळले आहेत. पंतजली योगपीठच्या अनेक संस्थांमध्ये दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सर्व रुग्णांना पंतजली संस्थेतच विलगीकरण करण्यात आले आहे. वेळ पडल्यास बाबा रामदेव यांचीही कोरोना चाचणी केली जाईल असे प्रशासनाने म्हटले आहे.