देशात दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात आहे तर एकीकडे गुजरातमध्ये कोरोना रुग्णसंख्येच्या संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये दर मिनिटाला जवळपास ४ रुग्ण मिळत असल्याचा वेग अहमदाबाद मिरर मध्ये म्हटलं आहे. गेल्या २४ तासात ६,६९० रुग्ण आढळले असून राज्यात ६९ जणांचा मृत्यू झाला आहे.
अहमदाबाद प्रथम स्थानावर असून २,२५१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर १,००० हून अधिक रुग्ण आढळल्याने सुरत दुसऱ्या स्थानावर आहे. तर आतापर्यंत गुजरातमध्ये ३,६०,२०६ एवढे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस गुजरातमध्ये रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे.